आदिवासींची नोकरीतील जागा बळकवनाऱ्यांना केंद्राचा दणका

0
175

यवतमाळ : आदिवासींसाठी राखीव असलेल्या जागांवर नोकरी पटकावणाऱ्या गैरआदिवासींना केंद्राने मोठा फटका दिला आहे. २००९ नंतर अशा कर्मचाऱ्यांनी जे आर्थिक लाभ घेतले आहेत, ते सर्व वसूल करावे, असे आदेश केंद्र सरकारच्या कार्मिक-प्रशिक्षण विभागासह वित्त विभागानेही दिले आहेत. बँका, रेल्वे, एलआयसी, वित्तीय कंपन्या आणि महामंडळांतील गैरआदिवासी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा दणका दिला आहे.
केंद्र सरकारच्या सेवेत अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर लागलेल्या कोष्टी, हलबा कोष्टी यांच्या नोकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी कार्मिक व प्रशिक्षण विभागाने १० ऑगस्ट २०१० रोजी परिपत्रक जारी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here