मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय अधिकारी राजीव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

0
217

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय अधिकारी मानले जाणाऱ्या राजीव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयानं धक्का दिला आहे. कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त असलेल्या राजीव यांच्या अटकेला देण्यात आलेली स्थगिती न्यायालयानं हटवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं राजीव यांना अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं आहे. यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.सात दिवसांत अटकपूर्व जामीन न मिळाल्यास सीबीआय राजीव यांना अटक करू शकते, असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here