श्रीलंकेतील लष्कराची सोशल मीडियावर मोहीम

0
88

श्रीलंका:
श्रीलंकेत दहशतवादी हल्ल्यानंतर मुस्लीमविरोधी दंगलीच्या घटना घडत असताना श्रीलंकेतील लष्कराने याविरोधात सोशल मीडियावर मोहीमच सुरु केली आहे. श्रीलंकेतील जनतेसाठी सैन्याने २० मेसेज तयार केले असून हे मेसेजेस जास्तीत जास्त लोकांनी शेअर करावेत, असे आवाहन श्रीलंकेतील सैन्याने केले आहे.

श्रीलंकेत २१ एप्रिलला इस्टर रविवारी झालेल्या बॉम्बहल्ल्यात २६० जण मरण पावल्यानंतर अजूनही तेथील ख्रिश्चन-मुस्लीम तणाव कायम आहे. याशिवाय सिंहली- मुस्लीम यांच्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. यासाठी फेसबुक आणि व्हॉट्स अॅप कारणीभूत ठरत असल्याचे लक्षात येताच श्रीलंकेत सोशल मीडियावर निर्बंध घालण्यात आले होते. आता श्रीलंकेच्या सैन्याने सोशल मीडियामुळे तणाव निर्माण होऊ नये यासाठी पुढाकार घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here