गोडसे यांच्याबाबत दिलेल्या वक्तव्यावरून एकाने चप्पल फेकले

0
623

तामिळनाडू:
तामिळनाडू च्या मुदाराईमध्ये बुधवारी एका प्रचारसभेदरम्यान दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांनी बोलताना नथुराम गोडसे हा स्वतंत्र हिंदुस्थानातील पहिला हिंदू दहशतवादी होता असे विधान केले .त्यावर एकाने त्यांच्यावर चप्पल फेकली. परंतु नेम हुकल्याने ती त्यांना लागली नाही. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.दरम्यान, गोडसे यांच्याबाबत दिलेल्या वक्तव्यावरून कमल हासन अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरोधात अरावाकुरुची येथे एफआयआर दाखल करण्यात आली आहे.यानंतर बुधवारी त्यांनी अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here