उजळाईवडी येथे मृतदेह ; घातपाताची शक्यता

0
1044

कोल्हापूर:
.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी विश्वकर्मानगर (हायवे पासून जवळ असलेल्या स्कप गोडाऊन येथे गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास अर्जुन बसप्पा केंगानूर (वय-४५) रा.कैरीमनी ता.सौन्दती जि. बेळगाव सध्या रा.गोकुळ शिरगाव यांचा मृतदेह येथे पोलिसांना सापडला .त्याच्या मृत्यू बाबत अधिक माहिती मिळाली नाही. त्याचा खून की घातपात अजूनही समजलेले नाही. पोलिसांना त्याच्या डोक्यावर रक्ताचे घाव दिसून आले असून मृतदेह शेजारी मिळालेल्या डायरीवरून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता. त्याचे भाऊ ही एका गॅरेज वर वाचमन करत असल्याचे समजले त्यालाही बोलावून घेतल्यानंतर त्याची ओळख पटली आहे.खून की घातपात याविषयी अजून माहिती मिळालेली नाही. घटबास्थळी करवीर उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ .प्रशांत अमृतकर यांनी भेट दिली आहे. तर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे व सपोनि राणी पाटील यांच्यासह पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये नेहला आहे. अर्जुन केंगानूर हा गोकुळ शिरगाव येथे एका खाजगी कंपनीत वाचमन म्हणून कामाला होता .तो अविवाहित असल्याने गेल्या तीन महिन्यापासून येथे वास्तव्यास होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here