निकृष्ट दर्जाचे साकव व प्रलंबित विकासकामांसाठी धरणे.

0
139

आजरा प्रतिनिधी. डेमोक्रेटीक पार्टी आँफ इंडिया चे एक दिवशी लक्षणीय आंदोलन आजरा तहसिल समोर करण्यात आले. आजरा तालुक्यातील चालु असलेली साकव, व रस्ते हे निकृष्ट दर्जाचे असुन समंधीत ठेकेदार यांची चौकशी होऊन कारवाई व्हावी. व आजरा शहरा नजीक असलेले इंग्रज काळातील व्हिक्टोरिया पुलाची शंभर वर्ष पुर्ण झाली. असुंन मुदत संपली तरी अजुन या पुलाबाबत शासन ठोस निर्नय घेत नाही आशा विविध मागणीसाठी हे एक दिवशीय आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन आजरा तहसिलदार यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे कि आजरा तालुका हा खनिज, नैसर्गिक पर्यटन म्हणून ओळखला जातो. या तालुक्यामध्ये विविध खनिज साठेही आहेत. असा आजरा आजरा तालुका असुंन या तालुक्यात शासन दुर्लक्ष करत आहे. आजरा तालुक्यातील बस स्थाकांचे काम गेल्या दोन वर्षापासुंन चालु आहे. अजुन अपुर्ण आहे. पावसाळा समोर येत आहे. प्रवाशांना उंभ राहयला जागाही अपुरी आहे. हे बस स्थाकांचे काम अजुन का संतगतीने चालु आहे. यांची चौकशी व्हावी. व पावसापुर्वी उर्वरित काम व्हावे, तसेच आजरा परिसरातील वनविभाचे अधिकारी पशू प्राण्याची देखभाल न करता किंवा वन प्राण्याचा होणारा शेतकरी वर्गाला त्रास याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यापुढे निवेदनाने व लक्षवेधी आंदोलनाने केलेले मागणीकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात रास्ता रोखो व आजरा बंद असे आंदोलन हाती घेणार असल्याचा इशारा दिलाआहे. या निवेदनावर जिल्हा संपर्क अध्यक्ष संदिप सकट शहर जिल्हा अध्यक्ष राजेश कांबळे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुशाष साठे, जिल्हा उप. अध्यक्ष दिपक लोखंडे, विक्रम साठे यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here