नागनाथ मांदिर धार्मिक सोहळा उत्साहात सपंन्न ; आम. अबिटकर, आम. सतेज पाटील याचे कडुन प्रत्येकी पाच लाखांचा निधी.

0
566

भुदरगड प्रतिनिधी. पांगिरे ता. भुदरगड येथील नागनाथ मंदिराचा वास्तुशांती, कलशारोहन व होमहवन अमृत सोहळा धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडला. दि १० मे २०१९ पासुंन १३ मे २०१९ पंर्यत हा धार्मिक सोहळा चालु होता. या सोहळ्यासाठी जिल्हातील व पंचकृषीतील नेते, आमदार, पदअधिकारी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. काटसिध्देश्वर स्वामी याचे शिष्य चिदानंद स्वामी यांनी कलशारोहन पुजन केले. तर होम – हावन पुजा प्रसाद जोशी आकुर्डेकर यांनी केले. या मंदिरांच्या धार्मिक कार्यक्रमाला आलेले माजी मंत्री. आम. सतेज पाटील यांनी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी पाच लाख मदत करणार असल्याचे जाहीर केले. तर आम. प्रकाश आबिटकर यांनी मंदिरासमोरील रोड पाच लाख रु मंजुर करुन तात्काळ करुन घेतला. आम. श्री. पाटील, व आम. श्री अबिटकर यांच्या सहकार्याने ग्रामस्थानी कौतुक केले. या कार्यक्रमासाठी ग्रामास्थ पांगिरे यांनी गुढ्या उभ्या करुन एक धार्मिक व आनंदमय वातावरण तयार केले होते. प्रत्येक घरातील ग्रायस्थ या सोहळ्यात सहभागी झाला होता. तीन दिवस महाप्रसादाचे नियोजन केले होते. या प्रसादाचा लाभ पंचकृषीतील किमाण चाळीस हजार भाविक – भक्तानी महाप्रसादाचा लाभ घेतला. या माहाप्रसादाचे नियोजन ग्रामस्थ व एक तानाजी बारड या भक्ताने केले होते. यांच्या स्वखर्चाने एक दिवस महाप्रसाद देण्यात आला. गावामध्ये सरपंच सौ. शालन गुरव, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व सदस्य यांनी पाणी व इतर नियोजन केले. या कार्यक्रमासाठी आलेल्या जि. प. सदश्या रोहीणी अर्जुन आबिटकर यांनी या नागनाथ मंदिरा ठिकाणाला “क” वर्ग दर्जा मिळण्यासाठी जिल्हा परिषद वतीने प्रयत्न करणार आसल्याचे सागितले. या कार्यक्रमासाठी समिती अध्यक्ष रविंद्र भाटले व देवस्थान समिती. ग्रामस्थ यांनी परिक्ष्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here