सीआरपीएफच्या जवानांमुळे मी जिवंत : अमित शहा

0
261

नवी दिल्ली:
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान कोलकाता येथे प्रचंड हिंसाचार झाला. दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तृणमूल काँग्रेसने केलेल्या या हल्ल्यातून आपण थोडक्यात बचावलो आहोत. तेथे सीआरपीएफचे जवान उपस्थित होते. त्यांनी आपल्याला सुखरुप बाहेर काढले. सीआरपीएफचे जवान नसते तर आपण जिवंत राहिलो नसतो, असा गंभीर आरोप अमित शहा यांनी केला. मंगळवारच्या आपल्या रो शोवर हल्ला करून तृणमूल काँग्रेसनेच हिंसाचार घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here