राज्यात परीचारिंकाअभावी आरोग्य सेवा राम भरोसे

0
210

पुणे : राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील सरकारी रूग्णालयांमध्ये परिचारिकांच्या 25 हजार 274 मंजूर पदांपैकी 3 हजार 410 पदे रिक्त आहेत. त्यामुळे वैद्यकीय सेवेचा कणा मानल्या जाणा-या परिचारिकांवर या रिक्त पदांमुळे बोजा वाढलेला आहे. पदे भरायचीच नाहीत किंवा भरली तरी ती कंत्राटी अकरा महिने करारावर भरायची या शासनाच्या धोरणामुळे आरोग्यसेवेचा कणाच खिळखिळा झाला आहे.
इंडियन नर्सिंग कौन्सिलने(आयएनसी) शहर आणि ग्रामीण रूग्णालयांमध्ये किती परिचारिका असल्या पाहिजेत यासंदर्भातील प्रमाण निश्चित केले आहे. त्यानुसार शहरात एका रूग्णामागे तीन तर ग्रामीण भागात एका रूग्णामागे चार परिचारिका असणे बंधनकारक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here