पैशांच्या व्यवहारातून माजी सैनिकासह सहा जणांनी मिळून केले युवकाचे अपहरण

0
96

पिंपरी:
पैशांच्या व्यवहारातून माजी सैनिकासह सहा जणांनी मिळून युवकाचे अपहरण केले. ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री पिंपरी चौकात घडली. पिंपरी पोलिसांनी जळगाव पोलिसांच्या मदतीने अपहरण झालेल्या युवकाची सुटका करून आरोपींना बेड्या ठोकल्या.

यज्ञेश विनोद तिलवा (वय 33, रा . शिंदे वस्ती, रावेत) असे अपहरण आणि सुटका झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी माजी सैनिक दिलीप अवसरमल, किशोर सावंत आणि त्यांच्या चार साथीदारांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिलवा आणि आरोपींचा आर्थिक व्यवहार होता. त्या व्यवहारातील काही रक्कम तिलवा यांनी बँक खात्यात जमा केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here