भुदरगड तालुक्याने यावेळी अरुण डोंगळे यांना संधी द्यावी – अनिता डोंगळे

0
896

गारगोटी – प्रतिनिधी
पाचवडे ता.भुदरगड येथे बचत गट मेळावा व हळदी कुंकु कार्यक्रमामध्ये बोलताना सौ.अनिता अरुण डोंगळे म्हणाल्या माझे पती मा.अरुण डोंगळे साहेब यांना वडिल,चुलते व जेष्ठ बंधू यांच्याकडून नेतृत्व,कर्तृत्व व दातृत्व असा सक्षम वारसा लाभलेले असून आपल्या प्रचंड जनसंपर्काच्या बळावर येणाऱ्या विधानसभा निवडणूकीचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांना भुदरगड तालुक्यातून तुम्ही पाठबळ द्या असे आवाहन केले. सौ.राजेश्वरी सम्राट डोंगळे म्हणाल्या गेली तिन पिढ्या डोंगळे परिवार समाजकार्यात अग्रेसर आहे मतदारसंघातील अडीअडचणी माहित असणारे व सर्वसामान्य लोकांशी आपुलकीचे नात असणारे मा.अरुण डोंगळे साहेब यांना आपला माणूस म्हणून एक वेळ संधी द्या . यावेळी उपस्थित जिल्हा महिला कॉंग्रेस कमिटी सरचिटणीस सौ.साधना दत्तात्रय पाटील गुडाळ, सौ.वनिता शशिकांत गुजर, श्री.दत्तात्रय पाटील सर, श्री.डी.डी.पाटील, श्री.शशिकांत गुजर व महिला बचत गट च्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here