हणबरवाडी येथे आध्यात्मिक बाल संस्कार शिबिर सुरू

0
265

गारगोटी:(नितिन बोटे)
येथील सद्गुरू रामानंद महाराज मठ हणबरवाडी गारगोटी मध्ये अध्यात्मिक बाल संस्कार शिबिराचे उद्घाटन नुकतेच पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपाचे नेते व महाराष्ट्र जलसंधारणाचे सदस्य मा.श्री प्रविणसिंह सांवतसो होते.
यावेळी प्रमुख पाहुणे मा. श्री.अरुण पाटील खेबवडेकर ( गो सेवक ) यांनी आपले मनोगत मांडतांना म्हणाले की,शालेय शिक्षणाबरोबरच,निती,मुल्ये,संतांची शिकवण,परंपरा आचार विचार संस्करती यांची आज नितांत गरज आहे व ती या आध्यात्मिक शिबिरातूनच मिळेल. पांढरे महाराजांनी आयोजित केलेले हे शिबिर भविष्यात देशाचे आदर्श नागरिक घडवतील .हा उपक्रम सर्वांनी घेण्या योग्य स्तुत्य आहे.
या वेळी नायब तहसिलदार.आर.सी. पाटील. आळंदीचे संतोष पवार महाराज. पी.एस कांबळे. एस.के. पाटील. तुकाराम तानवडे संभाजी भालेकर . रामभाऊ कांबळे . आनंदा पाडळकर व सदाशिव रेडेकर तसेच शिबिरार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here