दुष्काळग्रस्त भागांचा दौरा आपण करणार नाही. तो काही टूरिस्ट स्पॉट नाही :राज ठाकरे

0
171

ठाणे : राज्य दुष्काळात होरपळत असताना शरद पवारांसह अनेक नेते दुष्काळ भागात दौरे करून शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत आहेत. मात्र या सगळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अगदी उलट भूमिका घेतली आहे. दुष्काळग्रस्त भागांचा दौरा आपण करणार नाही. तो काही टूरिस्ट स्पॉट नसल्याचे त्यांनी सांगितले असून, दुष्काळग्रस्तांसाठी कोणतीही मदत जाहीर करण्याच्या पदावर मी नाही. त्यामुळे नुसते तिथे जाऊन काय होणार. असा सवाल देखील राज ठाकरे यांनी विचारला आहे.

ठाणे येथे कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यापैकी एक राज्यातील दुष्काळाचा आणि दुसरा आगामी विधानसभा निवडणुकीचा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here