पंतप्रधान नरेंद्र मोदी दिग्विजय सिंहावर भडकले

0
225

नवी दिल्ली:
तेथील उमेदवार पसंत नसल्यानेच दिग्वीजय सिंह यांनी मतदान केले नाही. हा तुमचा घरचा मामला आहे. जे प्रथम मतदान करणार आहेत, त्यांना तुम्ही कसला संदेश दिला. दिग्गीराजा तुम्ही खूप मोठा अपराध केला असून लोकशाहीचा अपमान केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी रतलाम येथील प्रचार सभेत केला.

भोपाळमध्ये रविवारी मतदान होते. तेथून दिग्वीजय सिंह काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांचे मतदान गुना मतदारसंघात होते. मात्र, भोपाळमध्ये अडकून पडल्याने ते मतदान करायला गेले नाहीत. यावरुन दिग्वीजय सिंह यांच्यावर चौफेर टिका होऊ लागली आहे. जर काँग्रेसचा उमेदवार व मध्य प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले दिग्वीजय सिंह मतदान करत नाही तर त्यांनी लोकांना मतदान करा असे सांगण्याचा व मत मागण्याचा अधिकार नसल्याचा आरोप सुरु झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here