बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाई

0
94

बुलढाणा : अजिंठ्याच्या पर्वतरांगेत वसलेले बुलढाणा शहर आता उष्णतेच्या झळा सोसत आहेत. त्याचे कारण म्हणजे अवैधरित्या केली गेलेली वृक्षतोड आणि कोणतेही नियोजन नसल्याने खालावलेली जलपातळी. मराठवाडानंतर पश्चिम विदर्भातील बुलढाणा हे आता दुष्काळाकडे वळू लागले आहे. या बुलढाणा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून पाण्याची टंचाई सुरूच आहे.

शेगाव संग्रामपूर जळगाव जामोद देऊळगाव राजा या तालुक्यात तर ही टंचाई अत्यंत भीषण स्वरूपाची आहे. स्थानिक प्रशासनाने १९९ गावांमध्ये २०६ टँकर सुरू केले आहेत. पण बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावे अशी आहेत की जिथे बाराही महिने टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here