योगीराज मोबाईल्स अज्ञातांनी फोडले,3 लाख रुपयांचे हँडसेट आणि ८० हजारांची रोकड लंपास

0
71

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिके नजीक असलेले योगीराज मोबाईल्स हे दुकान रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी फोडले. सकाळी ही घटना उघडकीस आली. यामध्ये चोरटयांनी तब्बल ३ लाख रुपयांचे मोबाइल हॅन्डसेट आणि ८० हजार रुपयांची रोख रक्क्म लंपास केली. शहराच्या मध्यवर्ती भागातच ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास चालू केला आहे.
चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले असून पुढील तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here