तळेगावात 200 ते 300 वर्षे जुनी दगडी विहिर सापडली

0
93

पुणे : पूर्वीपासूनच पुण्याजवळील तळेगाव हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात अचानकपणे 200 ते 300 वर्षे जुनी चुनखडी आणि दगडी काम असलेली विहिर सापडली आहे. सेकंड होमसाठी प्रसिद्ध असलेल्या तळेगावची अनेक वैशिष्ट्य आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सतावतोय. तलावातील गाळ काढत असतानाच एक जुनी विहिर सापडली, जो चर्चेचा विषय बनलाय.

सध्या ज्या तळ्याचं काम सुरु आहे, याच तळ्यात पूर्वी सात विहिरी असल्याचा दावा पूर्वजांनी केल्याचं नागरिक सांगतात. सरकारवर अवलंबून न राहता या विहिरीची दुरुस्ती करण्याचा संकल्प तळेगावकरांनी केलाय. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here