लाहोर येथील सूफी पंथीयांच्या धार्मिक स्थळाजवळ बाँबस्फोट

0
183

लाहोर:
पाकिस्तानमधील लाहोर येथील सूफी पंथीयांच्या धार्मिक स्थळाजवळ बाँबस्फोट घडवण्यात आल्याचे वृत्त जिओ न्यूजने दिलं आहे.
लाहोर येथील दाता दरबार या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात किमान आठ जण ठार झाल्याचं वृत्त पाकिस्तान सरकारच्या रेडिओने दिलं आहे. तसेच 24 जण जखमी झाले असावेत असं देखील रेडिओ पाकिस्तानने म्हटलं आहे.

एक पोलीस व्हॅनही या बाँब हल्ल्याचं लक्ष्य बनली असल्याचं सांगण्यात येत आहे. आठपैकी पाच जण पोलीस आहेत.

इस्लाममध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजानच्या महिन्यात हा स्फोट झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here