नक्षलवादी हल्लेखोराचा समूळ बंदोबस्त करा : विहीपची मागणी

0
114

कोल्हापूर – महाराष्ट्र स्थापना दिनीच महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यामध्ये पंधरा पोलिस हुतात्मा झाले , यांचा तीव्र निषेध विश्व हिंदू परिषदेने देशातील सर्व जिल्ह्यात केला आहे , कोल्हापूर जिल्हा विहीप वतीने यांचा निषेध करून आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना जिल्हा मंत्री अॅड .रणजितसिंह घाटगे यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले . देशाच्या एकात्मतेलाच आव्हान ठरलेल्या दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र सरकारने युध्दपातळीवर पावले टाकून कठोर कारवाई करावी , अशी मागणी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडे या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . मा शिष्टमंडळात भारती मुसळे , शहाजी कांरडे , राजेंद्र मकोटे , मालोजी केरकर , तानाजी कांरडे आदिचा समावेश होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here