आदमापूर येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात १९ जोडपी विवाहबद्ध.

0
883

गारगोटी/प्रतिनिधीः
कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन व विद्यमान जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांंच्या वाढदिवसा निमित्त कै.गणपतराव डोंगळे सांस्कृतिक ट्रस्ट घोटवडे (ता.राधानगरी ),बाळुमामा देवालय व बाळुमामा फौंडेशन आदमापूर (ता.भुदरगड )यांच्यावतीने आदमापूर (ता भुदरगड )येथील सद्गुरु बाळुमामा देवालयात १९ जोडपी विवाहबद्ध झाली. काल मंगळवार दि.७ मे २०१९ रोजी दु.३ वा. ४५ मिनिटांनी या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न.
अरुणकुमार डोंगळे व त्यांचे कुटूंबिय गेली नऊ
वर्षे सामुदायिक विवाह सोहळ्याचा सामाजिक उपक्रम राबवित आहेत.
या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या वधूवरांना लग्नाचा पेहराव व संसारोपयोगी भांडी भेट.तसेच महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून शेतकरी वधूपित्यास १० हजार रुपये व मागासवर्गीय वधूपित्यास २० हजार रुपये अनुदान ट्रस्ट मार्फत मिळवून देणेत येणार आहे.विवाह सोहळ्यासाठी अक्षता पौराहित्य करणेसाठी भटजी, वधूवरांसाठी हार-तुरे तसेच व-हाडी मंडळींना भोजन आदींची व्यवस्था ट्रस्ट व देवालय समिती मार्फत करणेत आली होती.
वधू-वरांना शुभाशीर्वाद देणेसाठी बाळुमामा देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले,कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम,फौंडेशनचे अध्यक्ष विजयराव गुरव, गोकुळचे संचालक अरुणकुमार डोंगळे, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, रविंद्र आपटे,संचालक पी.डी.धुंदरे, कृष्णराव किरुळकर , विजयसिंह मोरे, अर्जून आबीटकर ,नाथाजी पाटील, राहूल देसाई, सुरेश नाईक एकनाथ पाटील ,व्हा.चेअरमन विठ्ठलराव खोराटे , उत्तम पाटील,सुधाकर साळोखे, सुप्रिया साळोखे, ए.डी.पाटील,दौलतराव जाधव,अनिलराव पाटील,विलासराव कांबळे ,भोगावतीचे संचालक बी .आर .पाटील, संजयसिह पाटील,उदयसिंह पाटील ,धिरज डोंगळे , विजयसिंह डोंगळे , पांडुरंग भांदिगरे, ,डी.डी.पाटील,धनाजी पाटील,गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे कोजिमासि संचालक एच.आर.पाटील,सात्ताप्पा पाटील,विलास पाटील आदीसह जिल्हयातील मांन्यवर व वधूवरांचे नातेवाईक पै-पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here