चोरट्याना तत्काळ पकडा गारगोटी शहर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

0
688

गारगोटी प्रतिनिधी
भुदरगड तालुक्याची राजधानी गारगोटी शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.चोरीच्या अनेक घटना घडत आहेत मात्र चोर काय पकडले जात नाहीत.चोरट्याने तात्काळ पकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे गारगोटी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याचे प्रमुख शरद मोरे यांच्या पुढाकरने करण्यात आली आहे.
निवेदनातील आशय पुढील प्रमाणे गारगोटी गावभागतील दादू बागवे यांची होंडा मोटर सायकल चोरीस गेली .सयाजी कौम्पेस येथील सचिन हॉटेल चे मालक भगवान जाधव यांची घरातील बेलेट चोरट्यांनी चोरली. तर के डी देसाई कॉलनी तील एम एच 09 ईडी 6059 ही विकास रायजाधव यांची बुलेट रात्रीच्या वेळी चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करून चोरली.गारगोटी शहरात वाहने चोरणारी टोळी कार्यरत असल्याची चर्चा सुरू आहे.यापूर्वी गारगोटी शहरात पेट्रोल चोरणारी टोळी कार्यरत होती .या टोळीने पुन्हा डोके वर काढल्याचा संशय नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.तरी चोरट्याने तात्काळ पकडा व कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर उपसरपंच सचिन देसाई, ग्रामपंचायत सदस्य जयवंत गोरे.भालचंद्र कलकुटकी, राहुल कांबळे, माजी सरपंच शेखर देसाई,विजयराव आबिटकर, पांडुरंग सोरटे, नंदकुमार शिंदे,अजित देसाई, किरण पिसे, मानसिंग मोरे, सुनील कोटकर,उमेश सुतार, गौतम कांबळे,भीमराव गुंड, गौरव देसाई, विलास मोरे,गजानन पोवार,पाडुरंग मुगडे, विक्रम चव्हाण मनोज देसाई, आदी ग्रामस्थ व कार्यकत्यांच्या सह्या निवेदनावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here