थकीत बिलासाठी भोगावतीवर मोर्च्याचा इशारा

0
980

भोगावती :

थकीत एफआरपी व त्यावरील १५ टक्के व्याज, सवलतीच्या दरात साखर ,थकीत कामगारांचे पगार, तोडणी ओढणी बिले त्वरित द्यावी अशी मागणी शेकापक्षाच्या वतीने भोगावती सहकारी कारखान्याकडे करण्यात आली. आज दुपारी या शिष्टमंडळाने कार्यकारी संचालक व संचालक ए डी चौगले यांची भेट घेऊन मागण्यांबाबत निवेदन दिले. मागण्यांची पूर्तता केली नाही तर शेकापक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.यावेळी केरबा भाऊ पाटील,अशोकराव पवार,बाबासाहेब देवकर ,एकनाथ पाटील,अमित कांबळे ,मोहन पाटील,बाळासाहेब वरुटे,श्रीपती पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here