आकुर्डेतील “विजयमार्ग” रस्त्याचे काम दर्जेदार

0
619

गारगोटी. दि. ५
कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या निधीतून व भाजपा भूदरगड तालुकाध्यक्ष व बाजार समिती संचालक नाथाजी पाटील यांच्या प्रयत्नातुन,
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आकुर्डे ता. भुदरगड येथील “विजयमार्ग” या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे काम अतिशय चांगल्या दर्जाचे होत असल्यामूळे येथील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे..
छत्रपती शिवाजी महाराज दक्षीण दिग्वीजयाला जाण्या पूर्वी पाटगांव येथे मौनी महाराजांच्या दर्शनाला याच रस्त्यावरून चालत गेले होते. त्यानंतर छ. शिवाजी महाराजांनी दक्षिणेत स्वारी करुन मोठा विजय प्राप्त केला होता. त्या पराक्रमाची आठवण म्हणून या रस्त्याला तत्कालीन खासदार व मौनी विद्यापिठाचे संस्थापक व्ही.टी. पाटील यांनी “विजय मार्ग ” असे नाव देऊन आकुर्डे गावच्या वेशीवर दोन विजय स्तंभ उभे केले आहेत.
दरवर्षी मौनी महाराजांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून गारगोटीच्या मौनी विद्यापिठाचे वतीने याच मार्गावरुन ज्ञानज्योत आणली जाते. व या विजयस्तंभाची मौनी विद्यापिठ व आकुर्डे ग्रामपंचायत यांचे वतीने रंगरंगोटी केली जाते..
पण या मार्गाच्या डागडुजी व मजबुती करणाकडे मात्र अनेक वर्षे दुर्लक्ष झाले होते . ही बाब भाजपाचे भूदरगड तालुकाध्यक्ष व बाजार समिती संचालक नाथाजी पाटील व मौनी विद्यापिठ सदस्य श्री अलकेश कांदळकर यांनी पालकमंत्री नाम. चंद्रकांत दादा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी या रस्त्यासाठी तात्काळ निधी देण्याचे आदेश सा.बा. विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. व त्याचे काम तात्काळ सुरू होऊन ते आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे..
हे काम आकुर्डे ते आकुर्डे येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्या पर्यंत पूर्णत्वास जात असून या बंधाऱ्यापासून गारगोटी स्मशानभूमी पर्यंतच्या ६०० मीटर उर्वरीत कामाला लवकरच मंजूरी मिळेल अशी माहीती मौनी विद्यापीठ सदस्य अलकेश कांदळकर यांनी दिली.
या रस्त्यावरुन जवळचा मार्ग म्हणून आकुर्डे, शेणगांव, करडवाडी, कुंभारवाडी, आदी गावातील लोक गारगोटीला जाण्यासाठी वापर करतात. या रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण व मजबुतीकरण कामामूळे या गावातील जेष्ठ नागरीक, तरुण महिला मंडळी आणि शिवशंभुप्रेमींकडून समाधान व्यक्त होत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here