दि.06 मे 2019 ते 19 मे 2019 पर्यत प्रत्यक्ष गृहभेटीव्दारे क्षयरुग्ण शोधून उपचार केले जाणार

0
157

कोल्हापूर:
सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत दि.06 मे 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम जिल्ह्यात राबविण्यात् येणार आहे. देशात क्षयरोगाने प्रत्येक 3 मिनीटाला 2 मृत्यू होतो . क्षयरोग ही भारतातील एक प्रमुख सामाजिक आरोग्य समस्या असून देशात दररोज अंदाजे 6 हजार व्यक्तींना नव्याने क्षयरोग होतो. जागतिक आरोग्य संघटनेने सन 2030 पर्यत भारताला क्षयरोगमुक्त करण्याचे लक्ष ठेवले आहे तर शासनस्तरावर सन 2025 पर्यत ’ भारत क्षयरोग मुक्त’ करण्याची घोषणा केलेली आहे.
दोन आठवडयांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला, ताप, छातीत दुखणे, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त पडणे अशा रुग्णांनी या मोहीमे अंतर्गत मोफत तपासणी करुन घ्यावी. तसेच यापुर्वी क्षयरोगाचे उपचार घेतलेल्या रुग्णांनी सुध्दा आपला बेडका नमुना तपासणी करीता आरोग्य कर्मचा-यांकडे दयावा, व मोहीम कालावधीमध्ये घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचा-यांना योग्य ती माहिती द्यावी व या मोहिमेचा निरोगी अरोग्यासाठी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा जी.कुंभार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here