पिंपरखेड मध्ये कांद्याची वखार अज्ञात समाजकंटकाने दिली पेटवून

0
39

शिरूर:
एकीकडे तीव्र झालेली पाणीटंचाई व दुसरीकडे शेतमालाला भाव मिळत नसल्याने संकटात सापडलेला शेतकरी सध्या दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करत असताना शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे रात्रीच्या सुमारास शेतकरी एकनाथ भिकाजी गोसावी यांची कांद्याची वखार अज्ञात समाजकंटकाने पेटवून दिल्याची घटना घडलीय. यामध्ये त्यांच्या दोनशे पिशवी कांदा व वखारीचे असे एकूण दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा परिसरातील शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here