आजरा शिवसेनेचा गोकुळ पशुखाद्य दराबाबत रास्तारोखो.

0
279

आजरा. ता.संभाजी जाधव.: कोल्हापूर जिल्हात गोकुळ पशुखाद्य दराबाबत आंदोलने सुरु आहेत. दि २ रोजी करवीर मधुन सुरवात झाली. तर आज दि. ३ मे २०१९ रोजी दुसऱ्या टप्पात आजरा तालुक्यात जनावारे रत्यावार घेऊन जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोखो करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवने बोलताना म्हणाले गोकुळ मधुन दुधाचे दर दोन रु वाढवा म्हटले तर वाढत नाहीत पण शंभर रु. पशुखाद्य गोकुळ वाढ करुन सर्वसामान्य शेतकरी वर्गाकडुन गोकुळ लुट करत आहे. हे शिवसेना खपवुन घेणार नाही.जोपंर्यत गोकुळ आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपंर्यत या पशुखाद्य दरवाढीच्या निषेर्धात जिल्हात सर्वत्र आंदोलन करणार असल्याचे जिल्हाप्रमुख श्री. दवणे यांनी सागितले. उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, चंदगड विधानसभा संघटक संग्राम कुपेकर यांनी पंशुखाद्य दराबाबत व गोकुळच्या कारभाराचा पाढा वाचला. यावेळी गोकुळ अध्यक्ष यांच्या नावे दिलेले निवेदन नायब तहसिलदार डि. डि. कोळी यांना देण्यात आले. या निवेदनातील प्रमुख मागण्या. १) पशुखाद्य वाढीव १०० त्वरित रद्द करावा. २) दुधाला प्रतिलिटर २ रु. दरवाढ करावी. ३) सन २०१० ला गाईचे दुध प्रतीलिटर २७ रु होते. पण २०१८ ला गाईचे दुध प्रतीलिटर २५ रु. होते. सन २०१९ ला गाईचे दुध २३ रु असे महाराष्ट्र शासनाने ३१ जुलै २०१८ ला. ५ रु अनुदान जाहीर केले होते. तरीही गाईच्या दुधाला दर वाढ दिली नाही, गाईच्या दुधाला प्रतीलीटर २७ रु द्यावा. व ४) दुधाचा वास घेऊन दुध बाजुला काढले जाते. त्यामुळे दुध उत्पादक शेतकरी यांना नुसकान होत आहे. वासाचे दुध त्वरित बंद करावे अशा मागण्या निवेदनात आहेत. अर्धा तास चालेल्या या रास्ता रोकोने गोळुक विरोधात घोषनानी परिसर दणाणुन ठेवला. यावेळी. शिवसेनेचे उप. संघटक संभाजी पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र सावंत, युवराज पोवार , शहर प्रमुख औकार माद्याळकर, महिला आघाडी संज्योती माळवीकर, शांता जाधव, उप, ता. प्रमुख शिवाजी आढाव, पदअधिकारी विजय थोरवत, महेश दळवी, दिनेश कांबळे, विजय कोडुसकर, दयानंद कानेकर, सौरभ पाटील, महेश पाटील, गणपत मिसाळ, बबन चोगुले सह शिवसैनिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here