केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ वाहनांना टोलमाफी.

0
451

नवी दिल्ली:
देशात सध्या इलेक्ट्रीक वाहनांच्या बाजाराने बाळसे धरले आहे. मात्र, अद्याप चार्जिंग स्टेशनची सोय नसल्याने कोणीही या वाहनांना घेण्यास धजावत नाहीय. पुढील काही वर्षांत हळूहळू इलेक्ट्रीक वाहने विक्री वाढेलही, मात्र केंद्र सरकारनेही कंबर कसली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या असून टोलमाफीही केली आहे. याबाबतचे आदेशही त्यांनी राज्य सरकारना दिले आहेत. केंद्रीय रस्ते परिवाहन मंत्रालयाने इलेक्ट्रीक वाहनांना वेगळी ओळख मिळण्यासाठी या वाहनांची नंबरप्लेट हिरव्या रंगात आणण्याचा निर्णय घेतला आहे. यावर नंबर पांढऱ्या रंगात लिहिला जाणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी राज्यांना पत्र लिहून खासगी टॅक्सीसाठीच्या इलेक्ट्रीक वाहनांची नंबरप्लेट हिरव्या रंगाची ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यावरील नंबर पिवळ्या रंगात ठेवण्यास सांगितले आहे. नीति आयोगाने केंद्र सरकारसाठी एक प्रस्ताव तयार केला होता. यासाठी केंद्र सरकारची 7 मंत्रालय आणि अवजड उद्योगांची मदत घेण्यात आली आहे. यामध्ये खासगी टॅक्सीसाठी वापर होणाऱ्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी पार्किंग आणि टोल माफी करण्यात येणार आहे. हा फायदा या वाहनांना होण्यासाठी त्यांची वेगळी ओऴख पटावी म्हणून नंबरप्लेट हिरव्या रंगात देण्यात येणार आहे.

देशात सध्या 4 प्रकारच्या नंबरप्लेट अस्तित्वात आहेत. यामध्ये खासगी वाहनांसाठी पांढरी, टॅक्सीसाठी पिवळी, स्वत: चालक असलेल्या भाड्याच्या वाहनांसाठी काळी आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी निळी नंबरप्लेट असलेली वाहने आहेत. तर कंपन्यांच्या कार ज्या शोरुम आणि टेस्ट ड्राईव्हसाठी वापरल्या जातात त्यांच्यासाठी लाल रंगाची नंबरप्लेट देण्यात येते.

संरक्षण मंत्रालयाच्या वाहनांसाठी वेगळे नंबर –

संरक्षण मंत्रालयाच्या वाहनांसाठी वेगळ्या प्रकारचेनंबर देण्यात येतात. याचसोबत राष्ट्रपती आणि राज्यपालांसाठीच्या वाहनांना लाल रंगाच्या नंबरप्लेट असतात. तसेच त्यावर राष्ट्रीय प्रतीक असलेले अशोकचक्राचे चिन्हही लावलेले असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here