आता हिंदुस्थान आणि चीन हे देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉकच्या तयारीत

    915

    दिल्ली:
    इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, हिंदुस्थान हा तेल आयात करणारा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तर तेल आयातीत चीनचा दुसरा क्रमांक येतो. दोन्ही देशांना तेल उत्पादक देशांशी व्यवहार करताना मनमानी सौदेबाजीला सामोरं जावं लागतं. या सर्वांवर नियंत्रण ओपेक ही तेल व्यापाराशी संबंधित संस्था ठेवत असते हिंदुस्थान तब्बल 80 टक्के तेल आयात करतो. जर अशावेळी तेलाच्या किमती किंवा त्यावरील कर वाढले तर त्याचा थेट परिणाम देशातील आर्थिक व्यवहारांवर आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेवर होतो. मात्र, आता हिंदुस्थान आणि चीन हे दोन्ही देश तेलखरेदीसाठी बायर्स ब्लॉक तयार करण्याच्या विचारात आहेत.या ब्लॉकमुळे तेल उत्पादकांच्या मनमानी व्यवहारावर नियंत्रण राखता येणं शक्य होणार आहे.तसेच किमती ठरवण्यासाठी हिंदुस्थानच्या इशाऱ्यावर या तेल उत्पादक देशांना झुकत माप द्यावं लागेल.