उष्णतेची लाट; नागपुरातील शाळा बंद राहणार

356

नागपूर:
नागपूरमध्ये उन्हाचा पारा ४५ अंशाने गाठला आहे.तापत्या उन्हाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये म्हणून नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. राज्य मंडळासहित सीबीएसई आणि आयसीएसई शाळाही या महिनाभराच्या कालावधीत बंद ठेवण्यात याव्यात, असे प्रशासनाने कळविले आहे.तसेच परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालायकडून केले आहे.