पुणे शहराच्या तापमानाची विक्रमी नोंद

0
180

पुणे:
पुणे शहराच्या कमाल तापमानाने रविवारी नवा विक्रम नोंदविला. 122 वर्षांपूर्वी शहरातील तापमान 43.3 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. त्यानंतर रविवारी कमाल तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोचला.

शहरात गेल्या सहा दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मागील मंगळवारपासून कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविले जात आहे. गेल्या आठ दिवसांत कमाल तापमानात 4.4 अंश सेल्सिअसची वाढ झाल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढीची समस्या आता केवळ पृथ्वीच्या ध्रुवावरील बर्फ वितळण्यापुरती किंवा समुद्राची पाणीपातळी वाढण्यापुरती मर्यादित राहिली नसून, ती शहरापर्यंत पोचल्याचे हवामानतज्ज्ञांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here