मी युतीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी घोषणा दिल्या नाहीत: प्रियांका चतुर्वेदी

0
414

मुंबई:
काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे.”मी शिवसेनेत आले आहे. परंतु मी युतीच्या प्रचारसभांमध्ये किंवा रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी घोषणा दिल्या नाहीत”, असे म्हटले आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली होती. परंतु आता काँग्रेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर चतुर्वेदी भाजपचाच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेत आल्या आहेत. अनेक मुद्द्यांवर शिवसेना आणि भाजपची विचारधारा सारखीच असल्यामुळे ज्या भाजपच्या विचारधारेवर चतुर्वेदी यांनी सातत्याने टीका केली होती, त्याच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर चतुर्वेदींना पंतप्रधान मोदींविषयी आणि भारतीय जनता पक्षाविषयीची त्यांची मतं विचारली जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here