अकोल्यात ४५.१ ते ४६.३ अंश सेल्सिअसवर शहराचे तापमान;ट्रॅफिक सिग्नल बंद

0
193

अकोला : मागील दोन दिवसांपासून अकोल्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने अकोलेकरांसाठी वाहतूक विभागाने शहरातील सिग्नल 1 मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील वाहनचालकांना आता भरउन्हात सिग्नलवर थांबण्याची गरज भासणार नाही.

अकोल्यातील बुधवारी ४५.१ तर गुरुवारी ४६.३ सेल्सिअसवर शहराचे तापमान जाऊन पोहचले होते. या उष्ण वातावरणात ट्रॅफिक सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनधारकांना चटके सहन करावे लागतात. यातून उष्माघाताचा संभव नाकारता येत नाही. तेव्हा वाढत्या तापमानापासून अकोलेकरांचा बचाव व्हावा, यासाठी वाहतूक विभागाने २६ एप्रिल ते १ मे या कालावधीत शहरातील १३ ट्रॅफिक सिग्नल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here