पार्थ पवार यांचे मैत्रिणीसोबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल ; गुन्हा दाखल

0
1381

पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचे मैत्रिणीसोबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्याध्यक्षा वैशाली नागवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली नागवडे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त, जिल्ह्याधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली होती.

पार्थ पवार यांच्या महाविद्यालयीन जीवनातील हे फोटो आहेत. राजकारणात संबंधित तरुणीचा नाहक बळी दिला व तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले जात आहेत. विरोधी पक्षाचे हे कारस्थान असून पार्थ पवार यांची विनाकारण बदनामी करण्यासाठी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील खासगी फोटो शिवसेनेच्या फेसबुक पेज तसेच व्हाट्सअप्प ग्रुप यासारख्या सोशल मीडियात व्हायरल केल्याचे असल्याचे वैशाली नागवडे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here