परळी शहरावर पाण्याचे गंभीर संकट

0
207

परळी – परळी शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्‍यातील नागापूर येथील वाण मध्यम प्रकल्पाने तळ गाठला असून दीड लाख लोकसंख्येच्या परळी शहरावर पिण्याचे पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. या प्रकल्पातील
सुमारे १९ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या वाण नदीवर बांधण्यात आलेला वाण प्रकल्प एकदा भरला, की परळीकरांच्या पिण्याच्या पाण्याची दोन वर्षे चिंता दूर होते. सरलेल्या पावसाळ्यात वाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अपुरा पाऊस झाल्याने हा प्रकल्प यंदा भरला नव्हता. प्रकल्प जरी भरला नसला तरी प्रकल्पात पावसाळा सरत आला तेव्हा सुमारे १५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. गेल्या सहा महिन्यांत या प्रकल्पातील पाण्याचा शेती, उद्योगासाठी वापर झाला असला तरी परळीकरांसाठी प्रकल्पातील पाणी आरक्षित केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here