ऐनी येथील युवकाचा उजव्या कालव्यात बुडून म्रुत्यु

0
222

सरवडे : वार्ताहर
ऐनी( ता.राधानगरी )येथील कु.सागर गंगाराम कांबळे (वय 16 )याचा दूधगंगा धरणाच्या उजव्या कालव्या मध्ये पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाला सदर घटनेची नोंद राधानगरी पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली असून शवविच्छेदन सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,कु. सागर गंगाराम कांबळे हा दुपारी मित्रांसमवेत दूधगंगा धरणाच्या आटेगाव तळेवाडी दरम्यानच्या उजव्या कालव्याच्या पात्रात पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा प्रवाह बरोबर वाहत गेल्याने घुटमळून सुमारे दोनशे मीटर अंतरावर त्याचा बुडून मृत्यू झाला अशी वर्दी त्याचा चुलत भाऊ अरुण कांबळे यांनी दिली आहे. कु.सागर हा इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होता .त्याचा स्वभाव मनमिळावू व हसतमुख होता सागर च्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे त्याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे पुढील तपास दोन पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन पारखे श्री यादव हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here