ऍक्टर ही गोंधळात असेल की मला अभिनयासाठी पैसे मिळतात परंतु मोदी माझ्यापेक्षा चांगला अभिनय करतात: ओवेसी

0
104

मुंबई : “टीव्हीवरील अँकर त्यांच्यासारखी अॅक्टिंग करु शकत नव्हते म्हणून मोदी खऱ्या अॅक्टरला घेऊन आले. पण अभिनेताही गोंधळला असेल की मला अभिनयासाठी पैसे मिळतात आणि मोदी तर माझ्यापेक्षा चांगला अभिनय करतात,” असा टोला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी लगावला.

धुळे मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहेमदुल्ला यांची मालेगावात प्रचारसभा झाली. त्यावेळी अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मुलाखतीवरुन ओवेसींनी टीका केली. मुशर्वत चौकात झालेल्या या सभेला मुस्लीम बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here