अंगणवाडी सेविकांना इलेक्शन ड्युटी सक्तीची नाही , ‘राष्ट्रसेवेच्या भावनेनं अंगणवाडी सेविकांनी हे ऐच्छिक काम करावं

0
62

मुंबई : अंगणवाडी सेविकांना इलेक्शन ड्युटी सक्तीची नाही. त्यामुळे निवडणुकीच्या कामासाठी न येणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केलं आहे.

मात्र त्याआधी कोर्टाबाहेर याचिकाकर्त्यांची समजूत काढताना आयोगाच्या वकिलांनी सांगितलं की ‘राष्ट्रसेवेच्या भावनेनं अंगणवाडी सेविकांनी हे ऐच्छिक काम करावं. त्यानंतर आयोगानं कोर्टाला सांगितलं की, ट्रेनिंग आणि पोलिंगच्या दिवसाचे प्रतिदिन 250 रूपये आणि जेवण किंवा जेवणाचे 150 रूपये भत्ता म्हणून दिले जातील. कल्याण, ठाणे आणि नवी मुंबई येथील 3700 अंगणवाडी सेविकांना चौथ्या टप्प्यासाठी इलेक्शन ड्युटीचं ट्रेनिंग दिलेलं आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here