पाकिस्तान ला अमेरिकेचा दणका;पुलवामा हल्ल्यानंतर सखोल चौकशी

0
183

मुंबई:
अमेरिकेनं पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. कारण, भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताननं भारताविरोधात एफ-16 विमानांचा वापर केला होता. हे अमेरिकेसोबत झालेल्या कराराचं उल्लंघन आहे. भारतानं पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं. पण, त्यानंतर देखील पाकिस्तान खोटं बोलत राहिला. भारतानं यासंबंधीचे पुरावे देखील अमेरिकेला दिले. पण, पाकिस्ताननं मात्र आम्ही भारताविरोधात एफ-16चा वापर केलाच नाही. सर्व विमानं सुरक्षित आहेत, असं म्हणणं कायम ठेवलं. मात्र, भारतानं याप्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी अमेरिकेकडे केली होती. त्यानंतर अमेरिकेनं आता याप्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानला हा मोठा धक्का आहे. यापूर्वी एका अमेरिकन मॅगझिननं पाकिस्तानकडे सर्व एफ-16 विमानं सुरक्षित असल्याचा दावा केला होता. पण, आता मात्र पाकिस्तानचा खोटारडेपणा समोर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here