तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सरासरी 61. 83 टक्के मतदानाची नोंद

0
67

मुंबई:
लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात काल राज्यातील 14 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. तिसऱ्या टप्प्यात राज्यात सरासरी 61. 83 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या टप्प्यात 1 कोटी 59 लाख 45 हजार 795 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महत्त्वाची बाब म्हणजे हातकणंगलेत सर्वाधिक 70.81 टक्के मतदान झालं, तर पुणेकर मतदारांनी मात्र निराशा केली, पुण्यात केवळ 47.97 टक्के मतदान झाले.

महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील 14 जागांसाठी 2 कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदारांपैकी आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार 61.83 टक्के म्हणजेच जवळपास 1 कोटी 59 लाख 45 हजार 795 मतदारांनी मतदान केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here