जपान मध्ये पुण्याचा डंका ,योगेंद्र पुराणिक महापालिकेची ( कुगीकाई) निवडणुकीत विजयी

0
164

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकांचे वातावरण असताना मूळ पुण्याचे असलेले योगेंद्र पुराणिक उर्फ योगी हे जपान मधील महापालिकेची ( कुगीकाई) निवडणुकीच्या रिंगणात विजयी झाले आहेत. भारतातील हजारो लोक जपानमध्ये राहायला सुरवात झाल्यापासून योगेंद्र पुराणिक हे पहिले भारतीय आहेत जे या निवडणुकांमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले आणि विजयी देखील झाले.

बिगर जपानी आणि स्थानिक जपानी नागरिक यांच्यातला दुरावा कमी होऊन एकोपा वाढावा, जपानी स्थानिक शाळांमध्ये इंग्रजी भाषेला वाव मिळावा, भारतीय लोक जे जपानमध्ये राहतात त्यांचा पेंशनबाबतचे प्रश्न सोडवता यावे, यासाठी आपण राजकारणात आलो असल्याचं त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here