करवीर पश्चिम भागात उस्फूर्तपणे मतदान

0
79

कुडित्रे (प्रतिनिधी) : करवीर पश्चिम भागात मंगळवारी सकाळपासून मतदान केंद्रावर मतदानासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघर, व्हीलचेअर, वैद्यकीय मदत केंद्र या सर्वांची व्यवस्था करण्यात आली होती. काही मतदान केंद्रावर मांडव घालून मतदारांना लागणाऱ्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पिण्याचे पाणी, मतदार मदत केंद्र, वैद्यकीय मदत कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. दुपारपर्यंत बहुतेक गावात ५० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. सकाळच्या टप्प्यात मतदान केंद्रावर गर्दी होती दुपारी ही गर्दी थोडीफार कमी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here