मराठा क्रांती मोर्चा वेळी वादग्रस्त चित्राबद्दल उद्धव ठाकरे , संजय राऊत यांना अटक वॉरंट

0
365

मुंबई : मराठा क्रांती मोर्चा वेळी वादग्रस्त व्यंगचित्र प्रकरणी पुसद न्यायालयाने उद्धव ठाकरे, ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यासह व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्या विरोधात वॉरंट जारी केलं आहे. न्यायालयाने समन्स बजावूनही उद्धव ठाकरे आणि इतर लोक न्यायालयात हजर न झाल्याने त्यांच्याविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे, संजत राऊत आणि इतर लोक न्यायालयाकडून समन्स बजावूनही मुद्दाम न्यायालयात हजर राहत नाहीत. अशा परिस्थितीत वॉरंटचा आदेश पाठविणे आवश्यक असल्याचं फिर्यादीच्या वकिलांनी म्हटलं आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here