डीवायएसपी अमृतकर आणि हसन मुश्रीफ यांच्यात जोरदार वादावादी

0
5541

कोल्हापूर :
कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील शेती व्यवसाय विद्या मंदिर मतदान केंद्राच्या आवारात सकाळी नऊच्या दरम्यान १०० मीटर अंतराच्या आत थांबण्याच्या कारणावरून सरपंच रणजित कांबळे, अमोल माळी, अजित शेटे, मंजुनाथ वराळे, प्रकाश शिनगारे आदींना पोलिस उपधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी पकडून गाडीत बसवण्याच्या कारणावरून गोंधळ उडाला.

दरम्यान आमदार हसन मुश्रीफ हे घटनास्थळी आले. त्यांनी सदर घटनेची माहिती घेऊन पोलिस उपधीक्षक अमृतकर यांना कोणत्या गुन्हावरून संबंधितांना अटक करत असल्याची विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद उत्पन्न झाला. आमदार मुश्रीफ यांनी याबाबत जिल्हाधिकारी दिलीप देसाई यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

सदरची घटना लोकशाहीला घातक आहे. दडपशाही पद्धतीने पोलिस भाजपचे काम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. अशाच प्रकारची कृत्ये यापूर्वीही गोकुळ दुध संघ आणि अनेक निवडणुकांच्यावेळी पोलिसांच्याकडून करण्यात आले आहे. संबंधितांनी कोणताही गुन्हा केला नाही. बूथ ताब्यात घेतलाला नाही, किंवा पैसे वाटले नाहीत त्यामुळे जाणीवपूर्वक अशी कृते पोलिस करत आहेत. याबाबत आपण वरिष्ठांकडे तक्रार करू या घटनेमुळे शांततेने चाललेल्या मतदानाला गालबोट लागेल, दंगा होईल, अशी भीती हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

दरम्यान, पोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी संबंधितांवर गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here