जेव्हा पवार यांच्यासारखे नेते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करतात, तेव्हा निवडणुकीत त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे ते द्योतक असते :विनोद तावडे

0
124

मुंबई:
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणूक प्रचारातील भाषा अतिशय खालच्या पातळीला गेली आहे. जेव्हा पवार यांच्यासारखे नेते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करतात, तेव्हा निवडणुकीत त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे ते द्योतक असते, अशा शब्दांत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

शरद पवार यांच्या प्रचाराच्या भाषेबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला आज उत्तर देताना तावडे म्हणाले, शरद पवार सध्या बुथ वरच्या सामान्य कार्यकर्त्यालाही फोन करुन माझ्यासाठी हे कर, माझ्यासाठी ते कर या प्रकारची भाषा वापरत आहेत. याचाच अर्थ सुप्रिया सुळे यांचे बारामतीमध्ये काही खरे नाही, हे बहुधा त्यांना कळले असावे असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here