नवरसवाडी ग्रामस्थांचा निवडणूकीवर बहिष्कार

0
184

गारगोटी -प्रतिनिधी
नवरसवाडी ता. भुदरगड ग्रामस्थ व युवकांनी लोकसभा तसेच येथून पुढे येणाऱ्या सर्व सार्वत्रिक निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे , गावामध्ये असणारी वर्षानुवर्षे पाणीटंचाई तसेच नवरसवाडी गावास जोडणाऱ्या रस्त्यांची दयनिय अवस्था गेली आठ ते दहा वर्षे रस्ता पाणी या मुलभूत सुविधांकडे शासन व लोकप्रतिनिधी यांनी कानाडोळा केल्यामुळे , वेळावेळी शासनाकडे व लोकप्रतिधी यांच्याकडे वारंवार मागणी करूनही काहीही उपयोग होत नसल्याने ग्रामस्थांसह नवयुवकांनी मतदानांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले आहे या निवेदनावर दिपक दत्तात्रय बाऊस्कर, योगेश परशराम पाटील, सुनिल आनंदा पाटील, साताप्पा कुंडलीक बोंगार्डे, प्रदिप दामोदर देसाई , सुनिल आनंदा सोहनी, अमोल रंगराव बाऊस्कर, अभिजीत पांडूरंग खतकर यांच्यासह युवक ग्रामस्थ यांच्या सह्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here