जोतिबा चैत्र यात्रेतील कोल्हापूर जिल्हा टू व्हिलर मेकॅनिकल असोसिएशनचे कार्य कौतुकास्पद

0
492

कोल्हापूर: दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा येथिल चैत्र यात्रा अखंड उत्साहात पार पडली. महाराष्ट्रासह ,कर्नाटक व इतर राज्यातून भाविकांनी उपस्थिती लावली. मिळेल त्या वाहनातून लोक गडावर डेरेदाखल झाले होते.त्यात दुचाकीवरून येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड,दुचाकी धारकांची ही अडचण लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा टू व्हिलर मेकॅनिकल असोसिएशनने मोफत दुरुस्ती कॅम्पचे आयोजन केले.गेली १९ वर्षे सामाजिक बांधिलकी जपत मोफत दुचाकी दुरुस्ती हे कार्य असोसिएशन मार्फत सुरू आहे. केर्ले गावापासून ते वर गडापर्यंत गाडी कोठेही बंद पडो अथवा टायर पंक्चर होवो असोसिएशन मार्फत मोफत दुरुस्ती करण्यात येत होती . विशेष बाब म्हणजे या मोफत दुरुस्ती कॅम्पचे उद्घाटन कॅम्पमध्ये सेवा देणाऱ्या लोकांच्या सौभाग्यवतींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अससोसिएशन चे अध्यक्ष संजय पाटणकर ,उपाध्यक्ष नाना गवळी ,सजन नाईक,माधव सावंत, बबन सावंत, रवी कांडेकरी आदीनी ही तत्पर सेवा बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here