सावित्रीबाई फुलेचा विचार आजच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा – जे बी बारदेसकर

0
189

आजरा:ता.( संभाजी जाधव.) जातीभेद नष्ट करणारा, समता प्रस्थापित करणारा आणि सत्याचा शोध घेणारा महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुलेंचा विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा तसेच वाचन संस्कृती ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड निर्माण करावी असे प्रतिपादन माजी प्राचार्य जे बी बारदेसकर यांनी केले.
पेरणोली ता आजरा येथील प्राथमिक मराठी शाळेत महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर आयोजीत व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा डॉ.सारिका पाटील होत्या.
बारदेसकर म्हणाले फुले दाम्पत्यामूळे आजचा बहुजन समाज शिक्षित झाला. फुलेंच्या जन्माअगोदर विशिष्ट उच्चवर्णीय समाजाचीच शिक्षणावर मक्तेदारी होती. फुले दाम्पत्याने विरोध पत्करून बहुजन समाजाला शिक्षणाची दारं खुली केली. विधवा स्त्रियांना जगण्याचा हक्क मिळवून दिला.
काल्पनिक देव देवतापेक्षा फुले, शाहू , आंबेडकर यांच्या विचाराची पुजा झाली पाहीजे. आजच्या विद्यार्थ्यांनी वाचन करून समाजसुधारकांचे विचार समजून घेतले पाहिजे. यावेळी कॉ. संपत देसाई, सदस्य कृष्णा सावंत, मुख्याध्यापक प्रकाश देऊसकर यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी सदस्य ऊदय कोडक, नंदकुमार देसाई, सुषमा मोहिते,रोहिणी देसाई, किर्ती परब, स्नेहा क्षीरसागर, पांडूरंग शिप्पूरकर, सुप्रिया भोगण , महादेव जाधव, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनुष्का गोवेकर यांनी केले. कविता नाईक यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here