विक्रोळीत शुक्रवारी मध्यरात्री ट्रक उलटल्याने 4 जणांचा जागीच मृत्यू

0
69

मुंबई:
मुंबईच्या विक्रोळी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री भरधाव वेगात आलेला ट्रक उलटल्याने 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विक्रोळीच्या पार्क साईट पोलीस स्टेशन परिसरात ट्रकचा हा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री ही घटना घडली आहे. रस्त्यावरून जात असताना नाल्याचा कोपरा तुटल्याने ट्रक उलटला. यामध्ये रोडवर असलेल्या 4 लोकांच्या अंगावर हा ट्रक पडला.

ट्रकखाली चिरडल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात जखमी झालेल्या एकाला तात्काळ उपचारासाठी नजिकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here