असा बॉम्ब फोडेन की, महाडिकांना प्रचार थांबवावा लागेल – महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील

0
10253

कोल्हापूर प्रतिनीधी,
विद्यमान खासदार महाडिक व त्यांच्या बगलबच्चांकडून माझ्याबाबत चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पण त्यांना एकच सांगू इच्छितो माझी छाती फाडल्यास त्यामध्ये फक्त आणि फक्त धनुष्यबान व प्रा.संजय मंडलिक हेच दिसतील. यापुढे महाडिकांनी व आमच्या पक्षात आलेल्या त्यांच्या बगल बच्चांनी या चुकीच्या बातम्या पसरवयाच्या बंद नाही केल्या तर असा बॉम्ब फोडेन की महाडिकांना प्रचार बंद करावा लागेस असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.
ते कडगांव (ता.भुदरगड) येथे शिवसेना-भाजपा, रिपाई (आ.), रासप, शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रा.संजयदादा मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेमध्ये बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, विद्यमान खासदारांनी मीच कोल्हापूरात विमान आणले, शिवाजी पूल बांधला, रेल्वेचा विस्तार केला, कोट्यावधी रुपयांचे रस्ते केले अशी वल्गना करत असून त्या कामांचे नारळही फोडत आहेत. परंतू त्यांना मला सांगावे वाटते की, युती शासनाने केलेल्या या सर्व कामांचे श्रेय घेण्याचा तुम्हाला अधिकार असून ज्या पक्षाचे देशात 4 खासदार आहेत. अशा विरोधी पक्षाच्या खासदाराने मी कोट्यावधी रुपयांचा निधी अणला अशी टिमकी वाजवू नये. ही निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अथवा विधानसभेची नाही आहे तर देशाचे भवित्यव्य व देश सुरक्षित ठेवणारी असून यामुळे मतदारांनी साड्या, भांडी व पायातील जोडवी तसेच जेवणावळी यासारख्या आमिषांनी न बळी पडता देशाचे हित लक्षात घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हाती एक हाती सत्ता देण्याकरीता प्रा.संजयदादा मंडलिक यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याची विनंती केली.
यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, युतीचे उमेदवार प्रा.संजयदादा मंडलिक यांच्याविषयी मतदार संघामध्ये लाट निर्माण झाली असून सर्वसामान्य जनतेने आपले मतदान कोणाला करावयाचे हे पक्के ठरवले असून आता ग्रामीण भागातील जनता कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. विद्यमान खासदारांनी विकासाच्या नावाखाली ग्रामीण भागातील जनतेची फसवणूक केली असून त्यामुळे त्यांच्याविषयी असणारी जनमाणसांची विश्वासहर्ता कमी झाली आहे. त्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे.
यावेळी बोलताना माजी उपसभापती सत्यजीत जाधव म्हणाले, आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून काम करत असलो तरी जिल्ह्याचे नेते सतेज पाटील साहेब यांच्या आदेशानूसार महायुतीचे उमेदवार प्रा.संजयदादा मंडलिक यांना विजयी करण्याकरीता जिवाचे रान करत आहोत.
यावेळी बोलताना माजी सभापती बाबा नांदेकर म्हणाले, देशाच्या सिमा सुरक्षित ठेवायच्या असतील तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची गरज आहे. त्याकरीता त्यांचे हात बळकट करण्यासाठी व कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रा.संजयदादा मंडलिक यांना जास्तीत जास्त मताधिक्य देवून खासदार करणे गरजेचे आहे.
यावेळी बिद्रीचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, माजी संचालक के.जी.नांदेकर, संघटनमंत्री बाबा देसाई, माजी संचालक दत्तात्रय उगले, युवा नेते संदीप वरंडेकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रविण सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील, विश्वजीत जाधव, तालुका प्रमुख प्रमुख अविनाश शिंदे, शिवाजी ढेंगे, विलास बेलेकर, जयवंत चोरगे, माजी सभापती पांडूरंग पाटील, अजित देसाई, सदाभाऊ देसाई, अरविंद देसाई, के.पी.जाधव, बाबूल सर, शहाजी देसाई, रमेश देसाई, तमास पिंटो, शुभांत ताम्हणेकर, मानसिंग पाटील, विश्वनाथ जाधव, श्रावण भारमल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here