कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार प्रा.संजयदादा मंडलिक यांच्यासाठी भाजपतर्फे वेतवडे, गगनबावडा येथे प्रचार मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्हा बँकेचे संचालक व भाजप नेते पी.जी.शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा पार पडला.यावेळी बोलताना पी.जी.शिंदे म्हणाले, माझी आणि संजयदादा मंडलिक यांची मैञी अभेद्य असून, भैरवनाथ मंदिर वेतवडे येथे ज्या नेत्यांच्या प्रचारसभा या अगोदर घेतलेत ते सर्व उमेदवार निवडून आलेत, त्यामुळे प्रा. संजयदादा मंडलिक यांचा विजय निश्चीत असून कार्यकर्त्यांनी जोरदार कामाला लागावे. या निवडणुकीच्या निमीत्ताने कधी नव्हे तो तालुक्यातील बंटी पाटील गट, नरके गट आणि आम्ही एकञ असून तालूक्यातून ८० टक्के मतदान युतीचे उमेदवार प्रा.संजयदादा मंडलिक यांना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मेळाव्यास संजय मंडलिक, जिल्हा बँकेचे संचालक व भाजप नेते पी.जी.शिंदे, शिवसेना नेते सुनिल मोदी, बहुउद्देशीय संस्था चेअरमन विलास पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार पोवार, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रा.अजय चौगुले, भाजप तालुकाध्यक्ष संदिप पाटील, मा.जि.प.सदस्य मेघाराणी जाधव, मा.पं.स.सभापती एकनाथ शिंदे, पं.स.सदस्य आनंदा पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस सरदार खाडे यांच्यासह हजारो लोक उपस्थित होते.